Maharashtra Today


३७० कलम

काश्मीरमधून ३७० कलम हटलेच पाहिजे; शिवसेनेची आग्रही मागणी

काश्मीरला खरा धोका पाकिस्तानपासून नसून काश्मीरचे नेते म्हणवून घेणाऱ्या फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती या नेत्यांपासून आहे. पाकिस्तानी सापाचा फणा मोदी यांनी ठेचला आहे. आता या विंचवांच्या नांग्या मोडा!

 

मुंबई : शिवसेनेने पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवण्याची मागणी केली आहे. काश्मिरी नेते फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यावर शिवसेनेने ‘सामना’ या मुखपत्रातून त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. फारुख अब्दुल्लांसारख्या लोकांनी ३७० कलम हटविण्यास फक्त विरोध केला नाही, तर फुटून निघण्याची अप्रत्यक्ष भाषा केल्याचीही टीका सामनातून केली आहे. काश्मीरला खरा धोका पाकिस्तानपासून नसून काश्मिरी नेत्यांपासून असल्याचं अग्रलेखातून शिवसेनेनं म्हटलं आहे. तसंच पाकिस्तानी सापाचा फणा मोदी यांनी ठेचला आहे.

आता या विंचवांच्या नांग्या मोडा! असं म्हणतं शिवसेनेने जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवण्याची आग्रही मागणी केली आहे. जम्मू-काश्मीरची समस्या ही पाकिस्तानात नसून प्रत्यक्ष आपल्या देशात आहे. काश्मिरातील मुख्य मुद्दा निवडणुका नसून ३७० कलम हटवणे हा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत ठणकावून सांगितले की, ‘३७० कलमाची व्यवस्था तात्पुरती आहे.’ याचा दुसरा अर्थ असा की, मोदी राजवट दिलेल्या शब्दास जागेल. हिंदुस्थानच्या पाठीत घुसलेला हा खंजीर काढला जाईल; पण काश्मीरचे नेते म्हणवून घेणाऱ्या फारुख अब्दुल्लांसारख्या लोकांनी ३७० कलम हटविण्यास फक्त विरोध केला नाही, तर फुटून निघण्याची अप्रत्यक्ष भाषा केली. अब्दुल्ला म्हणतात, ३७० कलम तात्पुरते असेल तर काश्मीरचा हिंदुस्थानातील विलयदेखील तात्पुरताच समजा. याचा दुसरा अर्थ असा की, ३७० हटवाल तर याद राखा! तिकडे दुसऱ्या नेत्या मेहबुबा मुफ्तीही फुदकल्या आहेत. हिंदुस्थानचा कायदा, घटना न मानता काश्मीरचे स्वतंत्र अस्तित्व राखावे. आमचा हिंदुस्थानशी संबंध नाही. आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे आहोत.

आमचे लाड थांबवाल तर पाकिस्तान आम्हाला मांडीवर बसवायला तयार आहे, अशा आरोळ्या मारणाऱ्यांनी आता समजून घेतले पाहिजे की, दिल्लीत मोदींचे राज्य आहे. काश्मिरात शांतता विकत घेण्याचे दिवस संपले. आता दहशतवाद व धमक्यांना भीक न घालणारे सरकार आले आहे- अशा शब्दांत शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून काश्मिरी नेत्यांवर टीका केली आहे.

https://www.maharashtratoday.co.in/saamana-editorial-on-article-370-in-jammu-kashmir/


Maharashtra Today
Zenda Chouwk, Dharmapeth, Nagpur
Aurangabad, MAHARASHTRA
Pincode : 440010
Email : maharashtratoday.ga@gmail.com
Phone : 7720097677
Mobile : 7720097677
Fax :
Website : #https://www.maharashtratoday.co.in

Send Enquiry By Email

Maharashtra Today

Maharashtra Today : latest and breaking news from nagpur, mumbai,pune and other cities of Maharashtra India. Maharashtra Today gives you the latest breaking news and live updates on #Politics, Union budget, entertainment, sports, business and education in Marathi, Hindi and English Language. Maharashtra Today no 1 online Daily news website which brings you India breaking news on - Politics, Elections, Sports, Entertainment etc as it happens live. Latest Konkan,Vidarbha, Marathwada and Western Maharashtra News only on Maharashtra Today.

Contetnt & Job Posted by Maharashtra Today

Location on Google Map of Maharashtra Today Aurangabad MAHARASHTRA

Post a Comment

hdsd

0 Comments

Directory Listing in Institution in GOA School in DELHI College in WEST BENGAL PMKVY Training Centre in MADHYA PRADESH service provider company in DELHI builder & construction in WEST BENGAL Courier Services in DELHI Health & Beauty in BIHAR Health & Beauty in MAHARASHTRA PMKVY Training Centre in TAMIL NADU Aadhar Enrollment Centre in ANDAMAN & NICOBAR Food and Beverages in UTTAR PRADESH School in HIMACHAL PRADESH Food & Drink in WEST BENGAL Computer and Internet in GUJRAT College in MADHYA PRADESH Coaching in ORISSA builder & construction in HARYANA Shopping in TAMIL NADU Scientific and Laboratory Instruments in HARYANA Doctor in PUNJAB Computer Sales And Services in ORISSA NGO in GUJRAT property dealer in UTTAR PRADESH Scientific and Laboratory Instruments in ORISSA Education & Jobs in KERALA Electronics And Electrical Goods in GUJRAT University in TAMIL NADU Shopping in BIHAR Modicare MSC in ARUNACHAL PRADESH Institution in KERALA Courier Services in BIHAR Tour & Travels in HIMACHAL PRADESH Printing and Publishing in BIHAR Abrasives and Allied Products in BIHAR Transportation in KARNATAKA Aadhar Enrollment Centre in KERALA Institution in UTTARAKHAND Shopping in WEST BENGAL Sports Goods and Equipments in UTTAR PRADESH Hardware and Software in ASSAM music & entertenment in KARNATAKA Advertising Agency in MAHARASHTRA Astrology in TAMIL NADU PHOTO/VIDEO in DELHI Automobile and Automative in BIHAR Telecommunication Products in PUNJAB Institution in ANDHRA PRADESH service provider company in UTTAR PRADESH Entertainment & Fun in GOA